Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
केशायुर्वेदाने दिली नवी ओळख

आमचे चौकोनी कुटूंब. वडिल एलआयसीमध्ये अधिकारी, आई गृहिणी तर भाऊ आताच एमबीए होऊन एका बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या कुटूंबात कोणीच डॉक्टर नाही. परंतु कुटुंबात एकतरी डॉक्टर असावा, अशी माझ्या आईच्या वडिलांची खूप इच्छा होती. पण आई थोडी भित्री असल्यामुळे तिला डॉक्टर होता आले नाही. त्यामुळे आपल्या नातीने तरी डॉक्टर व्हावे, अशी माझ्या नानांची (आजोबा) इच्छा होती.

    मला वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. पण मार्गदर्शन करायला कोणी नव्हते. प्रवेश परीक्षेत थोडे गुण कमी मिळाल्याने एमबीबीएसचा प्रवेश हुकला. मला दंतवैद्यकला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत होता. पण त्याऐवजी मी बीएएमएसला शुल्क भरून प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. एकतर वडिलांची नेहमी बदली होत असल्याने ते बाहेरगावी असत. त्यामुळे आई आणि भावासोबत राहून यवतमाळमध्येच बीएएमएस करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे तोवर आयुर्वेदाबाबत पुरेसे कुतूहल आणि आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.
    यवतमाळसारख्या भागात त्यावेळी आयुर्वेदाची फार क्रेझ नव्हती. माझ्यासोबत बीएएमएस झालेल्या एकूण पन्नास जणांपैकी मी सोडले, तर इतर कोणीही आयुर्वेदाची प्रॅक्टीस करत नाही. नाना जोशी यांचे विद्यार्थी डॉ. पंकज पवार यांच्याविषयी माहिती मिळाल्यावर मी तिथे जायला सुरवात केली. परंतु हवे तसे ज्ञान कदाचित मला प्राप्त करून घेता आले नाही. परंतु माझी आयुर्वेदाची भूक आणखी चाळवण्यास मदत झाली. खरेतर मला कावीळ झालेली असताना उपचारासाठी मला तिथल्या आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी पवार सरांशी माझा संपर्क निर्माण झाला.
    त्यानंतर अमरावतीमध्ये मला ‘एमडी’ला प्रवेश मिळाला. तिथे वैद्य जमदग्नी यांचे विद्यार्थी आणि वैद्य पाटणकर यांचे स्नेही वैद्य प्रसाद आमले यांच्याकडे जायचा योग आला. त्यांच्या सान्निध्यात पुष्कळशा गोष्टी शिकता आल्या. त्यात मुख्यत्वे पंचकर्म, वनस्पती दर्शन, औषधी निर्माण आदीचा समावेश होता. पण एमडीलाही तीच अडचण होती. आयुर्वेदातून एमडी करणारे आम्ही दोघेच होतो. कॉलेजकडून आमच्या ड्युटी लावल्या जायच्या. माझ्या दुसर्या सहाध्यायींचा ओढा अॅलोपॅथीकडे होता. त्यामुळे या सगळ्यातून मार्ग काढून मी आयुर्वेदाच्या प्रॅक्टीससाठी जायचे.
    एमडी झाल्यानंतर पुणे, केरळ अशा महत्त्वाच्या केंद्रांवर जाऊन जे शिकायला मिळाले नाही, ते शिकून घेतले. सिद्ध मेडिसीनचा मर्म थेरपीचा कोर्स, केरळमध्ये वैद्यरत्नममधून केरळी पंचकर्माचा कोर्स, वैद्य पाटणकरांकडे कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स केला. कारण एकदा प्रॅक्टीस सुरू झाली की फार काळ ती बंद करून असे शिकण्यासाठी बाहेर जाता येत नाही, हे मला माहित होते. वास्तविक, मी एमडी करत असतानाच कॉस्मेटॉलॉजीच्या कोर्सविषयी आणि वैद्य पाटणकर यांच्याविषयी मला माहिती मिळाली होती. परंतु वेळ नसल्याने त्यावेळी ते शक्य झाले नाही. पण एमडी झाल्यावर ‘आता पुरे झाले शिक्षण’ असे घरच्यांचे म्हणणे होते. पण मला पुणे-मुंबईत जाऊन थोडे नवीन काहीतरी शिकायची इच्छा होती. त्यासाठी ईएमएसच्या कोर्सला प्रवेश घेतला. त्याचे क्लासेस आठवड्यातून एकच दिवस होते. त्यामुळे इतर सहा दिवस मी गुरुकडे जाऊन आयुर्वेद शिकू शकेन, असे माझ्या मनात होते आणि त्यात मी यशस्वी झाले. पुण्यात आल्यावर मला वैद्य प्रशांत सुरू यांच्याकडून आयुर्वेदातील पंचभौतिक हे तत्त्व खूप सोप्या पद्धतीने शिकता आले. त्याशिवाय त्यांच्यातील सकारात्मक विचार, मायाळू स्वभाव अधिक भावला. वैद्य हरीश पाटणकर यांच्याकडे केवळ आयुर्वेदातील तत्वेच नाही, तर जीवनातील तत्त्वही शिकायला मिळाले. त्याआधी मला प्रॉडक्ट प्रिपरेशनच्या वर्कशॉपचा मेसेज आला होता. त्याची फी सहा हजार होती. पण या कॉस्मेटॉलॉजीच्या कोर्सची फी 30 हजार होती. मला वाटले ही फारच जास्त फी आहे. पण तरीही मी तो केला आणि तिथे जे ज्ञान मला मिळाले त्याच्याशी तुलना करता 30 हजार म्हणजे काहीच नाही, असे वाटले. तेव्हापासून पाटणकरांच्या जवळपास प्रत्येक बॅचमध्ये मी माझ्याकडून किमान एकतरी रेफरन्स देतेच. या कोर्सनंतर मला कॉस्मेटीक्स प्रिपरेशनच्या इतक्या ऑर्डर येत आहेत की वेळ पुरत नाही.

    कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स करण्यासाठी गेले असताना मला केशायुर्वेदविषयी माहिती मिळाली. हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे आणि इथे वैद्य पाटणकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याने चांगले काम करता येईल, असे वाटले. नागपूरसारख्या भागात आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठीही याचा वापर होईल, याची खात्री होती. यात वैद्याचे वैद्यत्व जपण्याची कल्पना खूप आवडली. तुमच्या क्लिनीकचे नाव बदलण्याची गरज नाही, तसेच याच कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्याची सक्तीही नाही, या गोष्टी खूप भावल्या.
    केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतल्यापासून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्रँचायजी घेतल्यापासून गेल्या एक वर्षांत माझ्याकडे आलेले 80 ते 90 टक्के रुग्ण केशायुर्वेदशी संबंधित आहेत. यापैकी जवळपास 80 टक्के रुग्णांच्या केसांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. त्यामुळे एक चांगला डाटाबेसही तयार होत आहे.
    नियमित येणार्या रुग्णांना उपचारांचा खूप फायदा होतो. या भागात तसे फार रुग्ण नियमित नसतात. पण एक चांगली घटना सांगण्यासारखी आहे. एका महिलेने अमरावतीमध्ये केशायुर्वेदचे उपचार घेतले. तिने तिथे एक वर्षाची ट्रीटमेंट घेतली. तिचे एक नातेवाईक नागपूरमध्ये राहात होते. त्यांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी माझा पत्ता शोधून काढला. त्यांना पाच-सहा महिन्यांची ट्रीटमेंट पुरेशी होती. पण तरीही एक वर्ष ट्रीटमेंट घेण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ती रुग्ण माझ्याकडे आता नियमितपणे ट्रीटमेंट घेत आहे.
केशायुर्वेदमुळे मला एक नवी ओळखच मिळाली म्हणा ना. जेव्हा एखाद्या डॉक्टरांच्या कार्यक्रमात, सेमिनार किंवा कॉन्फरन्समध्ये जाते, तेव्हा केशायुर्वेदचे कसे चाललेय, असे मला आधी विचारले जाते. ही नवी ओळख अनुभवताना खूप छान वाटते. यवतमाळसारख्या अविकसित भागात लोकांपर्यंत पोचण्याचे वेगळे मार्ग चोखाळायला हवेत. टीव्हीवर कार्यक्रम, मुलाखत झाली की रुग्णांचे फोन येतात. त्यामुळे लोकांपर्यंत पोचण्यासाठी अशा नव्या युक्त्या आणि मार्गांचा नियमितपणे व प्रभावी वापर करायला हवा.
केशायुर्वेदचे भविष्य उज्ज्वल आहेच. केशायुर्वेदची केंद्रे परदेशातही सुरू झाली आहेत. जेव्हा 108 सेंटर होतील, तेव्हा तर चित्र फारच वेगळे असेल याबाबत शंकेला वावच नाही. माझ्या परीने केशायुर्वेदला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. ही केवळ फ्रंचायजी नसून, माझ्या आरोग्यसेवेचा एक महत्वाचा धागा आहे, असे मला वाटते.

 

 

Organization Details

नाव: डॉ. प्रणाली शिवराम बारापात्रे
शिक्षण: बीएएमएस, एमडी (कायाचिकित्सा)
क्लिनिकचे नाव: कायस्थ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
पत्ता: द्वारा-प्रकाश वाटकर, 55, नगरविकास सोसायटी, रेल्वे क्रॉसिंगजवळ, मेन रोड, मनीषनगर, नागपूर.
मोबाईल: 9922662195
ई-मेल: [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2018 पासून
केशायुर्वेदशी सलग्न: 2017 पासून

Our Specialities

1. One stop solution for all your hair and skin problem.

2. Accurate diagnosis and perfect treatment.

3. Complete Scalp Analysis , Photography , Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient ) and HP (Hair Prakruti ) analysis.

4. Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s , Cosmetologist’s , Trichologist’s.

5. Wide range of hair and skin care herbal products.
About